फैजपूर – येथे लाईनमॅन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शुभ दिव्य लॉन्च मध्ये येथे आयोजित कार्यक्रमात परिसरातील लाईनमॅन कर्मचाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला . लाईनमॅन हे खरोखरच जीवावर खेळून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करीत असतात लाईनमॅन अहोरात्र काम करीत असताना अनेक घटनांना त्यांना सामोरे जावे लागते अनेक कारणाने ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होत असतो अश्यावेळी त्वरित पुरवठा सुरळीत व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते अशा प्रसंगी अडचणींवर मात करून जीवाची पर्वा न करता लाईनमन तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करून विद्युत पुरवठा सुरळीत करतात . यासाठी लाईनमॅन यांचा सन्मान झालाच पाहिजे असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोरखनाथ सपकाळे कार्यकारी अभियंता सावदा यांनी केले . यावेळी नितीन कुमार पाटील उपकार्यकारी अभियंता फैजपूर सब डिव्हिजन विनोद सरोदे सहाय्यक अभियंता फैजपूर कक्ष भैरू लाल पाटील सहा अभियंता न्हावी कक्ष सुमित मडावी पाडळसा कक्ष संदीप पाटील बामनोद कक्ष प्रसन्न पाटील हिंगोना कक्ष आकाश नेहते सांगवी कक्ष ऋतुजा पाटील ज्युनिअर इंजिनियर डोंगर कठोरा गुरुप्रिया शिंदे ज्युनिअर इंजिनियर भालोद आदी उपस्थित होते .

कक्ष रवींद्र सोनवणे फोरमन पाडळसा हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तसेच बामनोद येथील पंकज कुरकुरे लाईनमॅन , संदीप कोळी मनोगत व्यक्त केले फैजपुर सब डिव्हिजनचे सर्व कक्ष कर्मचारी अभियंता तसेच लाईनमन यावेळी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तसलीम तडवी , संदीप कोळी ,विशाल चौधरी , हबीब तडवी , जुम्मा तडवी ,आसिफ तडवी ,हेमंत चौधरी ,आकाश ठोंबरे ,कल्पेश चौधरी ,नील भूषण मेढे ,योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील ज्युनियर इंजिनियर यांनी केले तर पंकज बाविस्कर सहाय्यक अभियंता यांनी आभार मानले .


