गृहमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा : युवा संवाद सभेच्या माध्यमातून साधणार युवकांशी संवाद :

भुसावळ - देशाचे गृह व सहकार मंत्री माननीय नामदार अमितजी शहा यांचा उद्या जळगाव जिल्हा दौरा नियोजित केलेला असून या मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री.ना.गिरीष महाजन यांच्या माध्यमातून उद्या दु.1.00 वाजता सागर पार्क जळगाव येथे युवकांशी संवाद साधणार आहे.
   या भव्य युवा संवाद सभेला उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्हातील सर्व खासदार,आमदार,पदाधिकारी व युवा नवमतदार युवक-युवती उपस्थित राहणार आहे.

या भव्य दिव्य युवा संवाद सभेसाठी जिल्हातील सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,पूर्व जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांनी केले आहेत.