आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात भाषा टिकली पाहिजे- डॉ. सिंधू भंगाळे

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, येथे मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन तसेच कवी कुसुमाग्रज जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्त्या म्हणून धनाजी नाना महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. सिंधू भंगाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी भूषवले. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.एच ब-हाटे, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.जे एफ.पाटील प्रा.डॉ. के. के .अहिरे,डॉ. पुरुषोत्तम महाजन उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. भंगाळे म्हणाल्या की, मराठी भाषेची समृद्धी ही प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती आजतागायत कायम आहे. मराठीने अनेक स्थित्यंतर बघितली प्राचीन शिलालेख, ताम्रपट, प्राचीन ग्रंथ तसेच विविध राजवटीमध्ये मराठी भाषा ही महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाची प्रमुख भाषा होती. आपण मराठी भाषिक लोकांनी आजच्या युगामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून ती जगवली पाहिजे, टिकवली पाहिजे तसेच अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे त्याचप्रमाणे प्राचीन मराठी ही आपले अस्तित्व टिकवत आजपर्यंत पोहोचली आहे ही आपल्या मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. इंग्रजी भाषेच्या युगात काही भाषा या नष्ट झाल्या पण मराठी आजतागायत आपल्या समृद्ध वारसा जोपासत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. एफ.पाटील यांनी मांडले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरामध्ये मराठी विभागातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. सदर कार्यक्रमाला मराठी विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा जसे की, उखाणा स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, भित्तिपत्रिका स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा ,मराठी पुस्तक परीक्षण ,समीक्षण रसग्रहण स्पर्धा, तसेच मराठी व्याकरण प्रज्ञाशोध स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. त्यात प्रामुख्याने मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी देवेंद्र जुलाल धनगर, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी अश्विनी विनोद इंगळे, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी रूतिक राजेश इंगळे या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. मराठी व्याकरण प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका वंदना महाजन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी तर आभार डॉ. दीनानाथ पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्मिता चौधरी, डॉ. एस.टी धूम, डॉ. प्रफुल्ल इंगोले,प्रा. गौतम भालेराव, डॉ. मनोज पाटील, डॉ. राजाराम तायडे, प्रा. सुनील अडकमोल प्राध्यापिका डॉ. स्वाती महाजन, प्राध्यापिका शितल सोनवणे. प्राध्यापिका शलाका निकम, प्राध्यापिका अक्षरा साबळे इत्यादी प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.