छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त अभिवादन :

जळगाव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वरिष्ठ पदवीधर शिक्षक शंकरलाल साळुंखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पूर्वी सोनवणे, सुकन्या सोनवणे, लावण्या चिंचोले यांनी शिवरायांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती दिली. ईश्वरी चिंचोले, पूर्वी सोनवणे, श्रद्धा चिंचोले, देवयानी सोनवणे, अश्विनी अहिरे, सुकन्या सोनवणे यांनी शिवरायांच्या जन्माचा सामूहिक पोवाडा म्हटला. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार राजाराम पाटील यांनी मानले. यावेळी भावेश सोनवणे, आयुष चिंचोले, कल्पेश चिंचोले, विशाखा चिंचोले, श्वेता चिंचोले, श्रद्धा पाटील आदी विद्यार्थी उपस्थित होते.