चिनावल येथे भाविकांचा उसळला जनसागर : नवनाथ पारायणाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी : गावात फुलला भक्तीचा मळा :

चिनावल – चिनावल येथे आज दि 11 रोजी येथील श्री क्षेत्र नवनाथ मंदीर येथे धर्मनाथ बीज निमित्त चिनावल व रावेर यावल परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तगण यांचे तर्फे आयोजित भव्य नवनाथ पारायणाला आज चिनावल येथे भाविकांचा जनसागर उसळला व या एक दिवसीय नवनाथ पारायणामुळे गावात जणू भक्तीचा मळा फुलला होता पारायणाचे यंदाचे हे 11 वे वर्ष आहे दरसाल भाविकांना स्वामि समर्थ व नवनाथ पारायण केल्याने येणारी अनुभूती मुळे या पारायणा साठी दरसाल गर्दी वाढतच असते यंदा ही हजारो भाविकांनी सामुहिक पारायण केले तर शेकडो चिनावल करांनी या ठिकाणी सेवा दिली
येथील शरद बोरोले यांच्या प्लाँट समोर नवनाथ व कांलिका माता यांच्या जागृत भव्य पटांगणात हे पारायण सकाळी 8 वाजेपासून सुरू झाले या पारायणाला केवळ जळगाव जिल्हा च नव्हे तर नागपूर, बुलढाणा, तसेच रावेर यावल, भुसावळ, जळगाव तालुका व परिसरातून हजारो भाविक चिनावल येथे दाखल झाले होते
या ठिकाणी येणार्‍या भाविकांसाठी 900 श्लोकी नवनाथ ग्रथ, आसन, नारळ पेढे, पाण्याची बाटली हे स्टाल वर उपलब्ध करून देण्यात आले होते चिनावल श्री स्वामी समर्थ केद्र व रावेर यावल तालुक्यातील स्वामी समर्थ भक्तगण आयोजित या एकदिवसीय पारायणाला महिलांची उपस्थीती लाक्षणिक होती तर शेकडो पुरुष भक्तगणांनी उपस्थित साठी सेवा दिली
या पारायणा साठी सकाळी पहाटेपासून भव्य अशा मांडवात मध्ये महिलानी पारायणां साठी हजेरी लावली होती प्रसंगी उपस्थित भाविकांना चहा, साबुदाण्याचा फराळ, व संध्याकाळी महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन चिनावल येथील सेवेकऱयांनी केले होते
या वेळी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे 900 श्लोकी पारायण सुरू होते या वेळी अरविंद कोलते साहेब, बाळू पाटील सर, शरद बोरोले, राजू पाटील, कृणाल बोरोले, अनिल किरंगे सर, भास्कर सरोदे, सुनिल भंगाळे, आकाश भंगाळे, दामोदर महाजन, महेश बोडे, मनिष बोरोले, सागर भारंबे, तुषार भारंबे, दिनकर भंगाळे, सुधाकर पाटील, नरेद्र फेगडे, महेद्र बोरोले, डिगंबर बोरोले, पप्पू लोखडे, दामोदर महाजन, निळकंठ चौधरी व चिनावल येथील शेकडो तरुण, तरुणी, स्रि, पुरुषांनी या पारायणा साठी सेवा दिली या वेळी अरविंद कोलते यांनी श्री स्वामी समर्थ भक्ती व सेवा तसेच धर्मनाथ बिज निमित केलेले नवनाथां चे पारायणा मुळे मिळणारे पुण्य या बाबतीत निवेदन केले तर उपस्थितांनी आलेले अनुभव या वेळी माडले