भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुसावळ शहराच्या युवक कार्याध्यक्ष पदी निलेश सुरेश कोलते यांची नियुक्ती करण्यात आली.

यापूर्वी निलेश कोलते हे राष्ट्रवादी ओबीसी भुसावळ शहराध्यक्ष होते. त्यांचे कार्य व एकनिष्ठता पाहून पक्षश्रेष्ठी यांनी कार्याची जबाबदारी दिली असून .भुसावळ शहराच्या युवक कार्याध्यक्ष पदी नियुक्त करीत धुरा सोपविली आहे . यावेळी नियह यावेळी नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, भुसावळ राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) आणि युवक शहराध्यक्ष वसीम शेख आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल निलेश कोलते यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


