मोटारसायकल चोर व मोटारसायकल गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात :

जळगाव एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस नं.58/2024 भादवि कलम-379 प्रमाणे मोटारसायकल चोरी झाल्याबाबत
गुन्हा दाखल होता सदर गुन्हांची हकीकत अशी की यातील फिर्यादी रवि वासुदेव कुकरेजा वय-40, रा.सिधी कॉलनी जळगाव
यांची दिनांक 03.02.2024 रोजी दुपारी 02.00 ते दिनांक 05.02.2024 रोजी सांयकाळी 07.00 वाजेच्या दरम्यान कोणी अज्ञात चोरटयाने चोरीच्या इराद्याने यांची यामाहा कंपनीची एफ झेड मोटारसायकल घरासमोरुन चोरून नेली बाबत दिनांक
07.02.2024 रोजी दिनांक गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हांत पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त
बातमीवरुन दिनांक 10.02.2024 रोजी दुपारी 3 वाजता संशयीत आरोपी सुभाष ममराज राठोड वय-40, रा. खेळगाव
तांडा ता.एरंडोल जि.जळगाव यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर संशयीत आरोपी कडुन वरील गुन्हातील चोरीस गेलेली 60,000/- रु किं.ची यामाहा एफ झेड कंपनीची काळया निळ्या रंगाची मोटासायकल जप्त करण्यात आली आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, , अपर पोलीस अधिक्षक अशोक
नखाते व उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच पोलीस निरीक्षक बबन
मारुती आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाडे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे अशांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोना विकास सातदिवे करीत आहे.