विषारी द्रव्य सेवन केल्याने सामाजिक कार्यकर्ते पं. रवीओम शर्मा यांचा मृत्यू ;


भुसावळ – येथील शर्मा बिल्डिंग भजिया गल्ली ईमलीपुरा भागातील एका 55 वर्षीय इसमाने विषारी द्रव्य सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता घडली याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शर्मा बिल्डिंग भजिया गल्ली ईमलीपुरा भागातील
रहिवासी पंडित रविओम सुगणचंद शर्मा वय 55 यांनी 7 फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांना तात्काळ रिदम हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यांचेवर उपचार सुरू होते मात्र मृत्युशी झुंज देत असतांना आज शुक्रवार 9 रोजी दुपारी 12:30 वाजता पंडित रविओम शर्मा यांची प्राणज्योत मालवली. याबाबत उमाकांत सुगणचंद शर्मा यांनी खबर दिल्यावरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास हवालदार जितेंद्र पाटील हे करीत आहे.

सुगणचंद गजाधर शर्मा यांचे ते सुपुत्र होते तर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा ) यांचे बंधू , व भरत , हेमंत , पियुष यांचे काका होत . त्यांचे पश्चात मोठा परिवार आहे 10 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा राहते घरापासून निघणार आहे .

.