राहुल गांधींच्या निषेधार्थ भुसावळ भाजपा युवा मोर्चाने केला पुतळा दहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भुसावळ शहर भाजप व युवा मोर्चा तर्फे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी शहरातील सुरभी नगर येथे आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालय बाहेर राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास जोडे मारून त्याचे दहन करण्याचे आंदोलन केले. या वेळी राहुल गांधी व काँग्रेसच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पुतळा दहनास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे , संदिप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, सरचिटणीस लाजरस मणी, यशांक पाटील, उपाध्यक्ष क्रीश कोठारी, नागेश खरारे ,संकल्प वाणी,सचिन बऱ्हाटे,लखन रणधीर, गोपीसिंग राजपुत, चेतन सावकारे , देवेंद्र फालक, सचित बोंडे, सुमित बऱ्हाटे,वैभव लोणारी, हिमांशु दुसाणे,योगेश वाघ,प्रशांत देवकर, भावेश चौधरी,प्रशांत भट, सागर जाधव यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.