कपील वस्ती जवळ अपघात एक ठार दोन जखमी

(मयत आयुध निर्माणीचा कर्मचारी )
वरणगाव – आयुध निर्माणीतून सुटी झाल्या नंतर मोटर सायकलवरून घरी भुसावळला जात असताना कपील वस्ती जवळ झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर दोघ जखमी झाल्याची घटना सोमवर रोजी सायकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की भुसावळ येथील रहिवाशा असलेले वरणगाव आयुध निर्माणी कर्मचारी पराग सुरेश राणे (३६ ) व सोबत निलेश लिलाधर चौधरी हे दोघेही निर्माणीतून सुट्टी झाल्या नंतर एकाच मोटर सायकल क्र एम एच १९ बी एन गाडीने घरी भुसावळला जात असताना कपील वस्ती जवळ मोटर सायकलीला मागून जोरदार धडक दिल्याने पराग राणे जमीनीवर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाला तर निलेश चौधरी, रोहीत जयराज हे दोघे
जखमी झाले त्यांना तात्काळ भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचारा साठी नागरिकांच्या मदतीने हलविण्यात आले आहे
याबाबत रोहीत जयराज यांच्या खबरी वरून वरणगाव पोलीसात अज्ञात वाहण चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मोंढे हे करीत आहेत


