भुसावळ – भुसावळ येथील मुन्नाभाई सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट सामाजिक न्याय विभाग जिल्हा जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघ जिल्हा कार्याध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली

3/2/2024 रोजी मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री तथा नंदुरबार जिल्हा चे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अमळनेर येथील निवासस्थानी भुसावळ येथील मुन्नाभाई सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट सामाजिक न्याय विभाग जिल्हा जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघ जिल्हा कार्याध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली मुन्नाभाई सोनवणे यांना कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
या प्रसंगी रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ नगरीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष चौधरी (दाढी). रावेर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ऱविभाऊ सपकाळे.व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


