भुसावळ – केंद्र शासनाने वाहनचालकांसाठी केलेल्या हिट अँड रन कायद्याला टँकर, ट्रक चालकांनी विरोध केला
असून या सर्व चालकांनी
बेमुदत संप सुरू केला आहे. या मुळे इंधन
वाहतुक ठप्प होऊन इंधन तुटवडा होण्याच्या
शक्यतेमुळे भुसावळ शहरात सर्व पेट्रोल पंपावर
पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली असून पेट्रोल घेण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून आले .



