भुसावळ – येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, येथे दि. 1 जानेवारी व 2 जानेवारी 2024 रोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे ‘वार्षिक क्रीडा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे. त्यात क्रिकेट, बॅटमिंटन, गोळा फेक, तीन पायाची शर्यत, एक मिनिट शो स्पर्धा,रनिंग ,गीतगायन ,नृत्य अशा विविध स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना व संघाला दिनांक 2 जानेवारी रोजी पारितोषिक वितरण करण्यात येईल. पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार .संजय सावकारे हे आहेत .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती चेअरमन एम. एल. गोसावी व क्रीडासंमेलनाचे चेअरमन शारदा सोनवणे व त्यांची समिती, तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाविदयालायचे प्राचार्य डॉ. .एस. व्ही. पाटील ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय. एम. पाटील व पर्यवेक्षक स्वाती पाटील यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन . महेश फालक, सचिव विष्णू चौधरी,कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा व इतर सदस्यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा कार्यक्रमाला मिळाले आहेत.


