भुसावळ – दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भिजून शहरातील पंचशील नगर परिसर भागात असलेल्या शहीद अब्दुल हमीद हॉल मधील जिमचा तळभाग सोमवार दि 27 रोजी रात्री दहाच्या सुमारास अचानक कोसळला.यामुळे या हॉल मध्ये असलेले जवळपास बारा युवक किरकोळ जखमी झाले आहे,
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मात्र सुदैवाने कोणतीही घटना घडली नाही ,
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांकडून कळले आहे,
दरम्यान घटनेचे वृत्त कळताच नगरसेवक निर्मल कोठारी (पिंटू) यांनी धाव घेत जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलवले.




