भुसावळ – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भुसावळ यांच्याकडून शहीद स्मारक भुसावळ येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
26-11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय सैन्यदलात 19 मराठा इन्फंटरीमध्ये कार्यरत असलेले जवान रोहित पाटील यांच्याहस्ते भारतमातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.त्याचबरोबर संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी अभाविप चे जिल्हा छात्र शक्ती प्रमुख अथर्वे जंगले यांनी संविधानाची माहिती दिली, तसेच त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी व विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक संविधान वाचन केले.



