भुसावळात कोळी समाज बांधवांनी केले अर्धनग्न आंदोलन तर अकलूद फाट्यावर ‘रास्ता रोको’

भुसावळ- कोळी समाजाचे गेल्या १९ दिवसांपासून जळगांव
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून
त्यांना पाठींबा म्हणुन आज दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी
१ वाजता भुसावळ येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
पुतळ्याजवळ कोळी बांधवांनी अर्धनग्न अंदोलन करीत निषेध
मोर्चा काढला.
यामध्ये प्रामुख्याने भुसावळ, यावल, रावेर
तालुकातील कोळीसमाज बांधव उपस्थीत होते.


अकलूद फाट्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन :

कोळी समाजबांधवांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्‍न प्रलंबीत असल्याने कोळी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला. अकलूद फाट्यावरील टोल नाक्याजवळ हजारो अबालवृध्दांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तिन्ही रस्त्यांवरून जाणार्‍या वाहनांची कोंडी झाली.