वरणगाव आगार प्रमुखांच्या लेखी अश्वासना नंतर भाजपाचे बस रोको आंदोलन मागे :

वरणगाव – लांब पल्याच्या एस टी बस शहराच्या बस स्थानकावर न येता नवीन राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने प्रवाशाचे प्रचंड हाल होत असल्याने भाजपाने जळगाव आगार व्यवस्थापक यांना निवेदन देऊन बस रोको आंदोलनाचा इशारा दिला होता . याअनुषगाने आगार प्रमुखांनी वरणगावला भेट देत लेखी अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले

शहराच्या बाहेरुन नवीन राष्ट्रीय महामार्गा वाहतुकी साठी खुला झाल्या पासून लांब पल्याच्या एस टी बस स्थानकावर न येता शहराच्या बाहेरूनच जात असल्याने प्रवाशाना प्रचंड हाल सहन करीत भुसावळ किवा मुक्ताईनगर येथुन बस धरावी लागुन अर्थिक भुर्दड सहन करावा लागत होता याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी भाजपाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव आगार व्यवस्थापकाला निवेदन दिले यात सर्वच एस टी बस शहरातून वळविण्याची , बस वेळा पत्रक , एक कायम नियंत्रक , अशा वेगवेगळ्या मागण्या करीत
दि २७ शुक्रवार रोजी बस रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता . निवेदनाची त्वरित दखल घेत भुसावळ आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी वरणगाव येथे भेट देत निवेदन कर्ते सुनिल काळे , शे अखलाक शे युसुफ , गजानन वंजारी , गोलु राणे , मुस्लीम अन्सारी यांच्याशी चर्चा करून येत्या १४ नोव्हेबर पर्यत वेळ मागितला आहे
आपल्या सर्व मागण्या प्रवाशाच्या हिताच्या व एस टी महामंडळाच्या फायद्याच्या असल्याने जिल्ह्यातील सर्व बस सेवा व बाह्य जिल्ह्यातील लांब पल्याच्या बस सेवा पुरविण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा अवधी लागेल त्या साठी आंदोलन कर्त्यांनी वेळ द्यावा व आपले आंदोलन मागे घेण्यात अशी विनंती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी केल्या नंतर आदोलन तुर्त मागे घेतल्याचे सुनिल काळे यांनी सांगितले