आदिशक्ती मुक्ताई 744 वा जन्मोत्सव : सप्तशती पारायणास हजारो भाविकांची उपस्थिती :


मुक्ताईनगर – आदिशक्ती मुक्ताई समाधीस्थळ मूळमंदिर कोथळी येथे घटस्थापनेच्या शुभ दिनी श्री संत मुक्ताई 744 वा जन्मोत्सव पुष्पवृष्टी करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला शके बाराशे एक अश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिशक्ती मुक्ताई आपेगाव जि. संभाजीनगर येथे अवतार घेवून मुक्ताईनगर तापीतीरावर अंतर्धान समाधी घेतली. त्यानिमित्ताने आज नवरात्रीच्या पावनपर्वावर घटस्थापनेच्या शुभ दिनी संत मुक्ताई चा 744 वा जन्मोत्सव श्री संत मुक्ताई वारकरी व स्वामी समर्थ सेवेकरी यांच्या सहकार्यातून हजारो भाविकांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला आज पहाटे आईसाहेब मुक्ताईस संस्थानचे मानकरी संदीप रवींद्र पाटील व अंकिता रविंद्र पाटील यांनी महापूजा अभिषेक केला. सकाळी दहा वाजता एडवोकेट रवींद्र पाटील व रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांचे प्रतिमा पूजन करून दुर्गा सप्तशती पाठास सुरुवात झाली. तापी पूर्णा परिसरातील सेवेकरी व वारकरी महाराज मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ठीक 12:00 वाजता श्री संत मुक्ताई विजय ग्रंथातील तिसरा अध्याय वाचून जन्मोत्सव पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील खासदार रक्षाताई खडसे आमदार चंद्रकांत पाटील रोहिणीताई खडसे रवींद्र हरणे महाराज उद्धव महाराज जुनारे पुरुषोत्तम वंजारी सम्राट पाटील यांची उपस्थिती होती जन्मोत्सवाच्या वेळी पुष्पवृष्टी करताना भाविकांनी मुक्ताई चा गजर केला आरती नंतर फळे प्रसाद भाविकांना देण्यात आला. सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ सेवेकरी तापी पूर्णा परिसर यांनी परिश्रम घेतले.
मूळ मुक्ताई मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती तसेच नवीन मुक्ताई मंदिर येथे नऊ दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सवास आरंभ झाला दसऱ्याच्या दिवशी या सोहळ्याची सांगता काल्याचे किर्तनाने होईल