भुसावळ –
शहरातील
कुख्यात गुंड निखिल राजपूत याचे बाहेर अनैतिक संबंध असून तो बहिणीला त्रास देतो या कारणावरून संतप्त शालकाने मेव्हणा निखिल यांचेवर सपासप चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना येथे घडली :
याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशन ला
दिनांक 2/09/2023 रोजी
गुरंन 454/2023 भादवि कलम 302 प्रमाणे दिनांक 02/09/2023 रोजी
10/30 वाजता दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयातील फिर्यादी सुरेश पांडु शिंदे, वय -68, व्यवसाय – खाजगी बस चालक, रा- दत्तनगर वांजोळा
रोड,भुसावळ यांनी पोलीस स्टेशन येवुन फिर्याद दिली की, आज दिनांक 02/09/2023 रोजी मध्यरात्री 02 ते
03 वाजताचे सुमारास निवृतीनगर येथील काशी विश्वेवर मंदरा समोरील, नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा
योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या टेरेसवर त्यांचा मुलगा निखील सुरेश राजपुत [पाटील],वय-29 वर्षे,रा-
दत्तनगर, वांजोळा रोड, भुसावळ हा झोपण्यास गेलेला होता. यातील आरोपी निलेश चंद्रकांत ठाकुर, वय-22, रा-
कंडारी,ता-भुसावळ हा मयताची पत्नी भाग्यश्री निखील राजपुत हीचा भाऊ आहे. यातील मयत याने दुस-या
बाईसोबत प्रेमसंबध ठेवल्याने मयत हा त्याची पत्नी भाग्यश्री हीचेशी नेहमी भांडण करीत होता. त्याचा मनात राग
ठेवुन यातील आरोपीताने चाकु सारख्या धारदार शस्त्राने मयताचे गळयावर, छातीवर वार करून गंभीर दुखापत
करुन जिवे ठार केले. त्यावरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला मयताचे वडील/फिर्यादी सुरेश राजपूत यांनी आरोपीताचे विरुद्ध
फिर्याद दिलेवरुन गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचा तपास एम. राजकुमार पोलीस अधिक्षक, जळगांव, चंद्रकांत गवळी,अप्पर पोलीस
अधिक्षक,जळगांव भाग, संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव भाग, किसनराव नजनपाटील,
पोलीस निरिक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, बबन आव्हाड, पोलीस निरिक्षक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी
घटनास्थळी भेट दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शना नुसार सपोनि / हरिष भोये यांनी केला असुन
काही तासातच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ/ विजय नेरकर, पोहेकॉ/ रमण सुरळकर,
पोहेकॉ निलेश चौधरी, पोहेकॉ/ उमाकांत पाटील, पोहेकॉ/ यासीन सत्तार पिंजारी, पोहेकॉ/ महेश
चौधरीपोकॉ/ योगश माळी, पोकॉ/ सचिन चौधरी, पोकॉ/ जावेद शहा, पोकॉ/ प्रशांत सोनार, पोकॉ/
योगेश महाजन, पोना/ दिनेश कापडणे, पोकॉ/ अमर आढाळे यांचे मदतनीने आरोपीतास लागलीच ताब्यात घेवुन
अटक केली आहे. यातील मयत याचे प्रेतावर पी एम होवुन अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.



