भुसावळ :-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित २२ वी राज्य ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल अजिंक्यपद क्रिकेट क्रिकेट स्पर्धा नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालय येथे होत असून पहिल्या सामन्यात जळगाव संघाने धुळे संघाचा २५ धावांनी पराभव करत स्पर्धेमध्ये विजय सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करताना जळगाव संघाने ८० काढल्या. जळगाव संघातर्फे वेदांत चौधरी अप्फान सैयद, मोहित भोई व कुलदीप कोळी यांनी ऑलराऊंडर प्रदर्शन करत धुळे संघावर २५ धावांनी मिळवत विजयी सुरुवात केली. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्हा संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतून जम्मू कश्मीर येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे.
जळगाव संघ असा-
कुलदीप कोळी (कर्णधार), वेदांत चौधरी (उपकर्णधार), मोहित भोई, भाग्येश महाडिक, अफान सैय्यद, रणवीर यादव, ओम चौधरी, उत्कर्ष पाटील, भुवनेश ठोके, निहार पाटील, हर्ष चौधरी, आयुष महाडिक, जयेश कोळी, ऋषिकेश सूर्यवंशी, अबूजर पटेल (प्रशिक्षक), राहुल पाटील (व्यवस्थापक)
विजय संघाला राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव डाँ.मो.बाबर, उपाध्यक्ष बाबूलाल धोत्रे, भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनचे निरीक्षक उस्मान सिद्दिकी, मुकुंद झंन्कर, दुर्गेश हरीणखेडे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, मयूर ठाकरे विशाल पवार आदींनी संघाचे कौतुक केले.
जळगाव संघासोबत डॉ.मो. बाबर, बाबूलाल धोत्रे ,उस्मान सिद्दिकी ,वासेम पटेल, मुकुंद झनकर दुर्गेश हिरणखेडे.


