अध्यापक विद्यालय खिरोदा येथे छात्रध्यापकांसाठी समपुदेशन शिबिर संपन्न —-

भुसावळ – अध्यापक विद्यालय खिरोदा येथे प्रथम व द्वितीय छात्रध्यापकांना सामुपदेशीका आरती चौधरी यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट ,टाइम मॅनेजमेंट , भावनात्मक मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. राग आल्यास उलटे अंक म्हणावे तसेच खोल श्वास घेत जावे, स्ट्रेस ला मॅनेज करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे योग , ध्यान धारणा करावी. मोबाइल च्या व्यसनांपासून लांब रहावे सर्वात घातक व्यसन म्हणजे मोबाइल असे त्यांनी या वेळी सांगितले. समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे फी न घेता सौ.आरती चौधरी सामुपदेशन करतात व मार्गदर्शन करतात. आरती ताई ह्या सक्षम काऊन्सिलिंग सेटंर भुसावळच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
या प्रसंगी युवा नेतृत्व धनंजय भाऊ चौधरी यांना युथ लीडर2023 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. अरुणा चौधरी होत्या. प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. प्रतिभा बोरोले यांनी केले. सुत्र संचालन सौ. हेमांगी चौधरी यांनी केले. आभार सौ. अरुणा पदमे यांनी केले .