यावल तालुक्यातील मालोद येथील तरुणीचे अपहरण ; पोलिसात गुन्हा दाखल

रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी यावल तालुक्यात आपल्या नातेवाईकांकडे आली असता १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मूळची कांडवेल येथील रहिवाशी असलेली सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी यावल तालुक्यातील मालोद येथे आपल्या भावाकडे आली असता कुठल्यातरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी तरी आमिष दाखवत फूस लावून तिला पळवून नेत तिचे अपहरण केले.

सदरचा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात यावल पोलिसस्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.