तणावमुक्त राहण्यासाठी नेहमी समाधानी व आनंदी असावे – डाँ. उर्मी ठक्कर : राखी पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर महिला क्रीडा मंडळाचे पोलीस बंधूंना “तणावमुक्ती कार्यक्रमाची भेट.


भुसावळ – तणावमुक्त राहण्यासाठी नेहमी समाधानी व आनंदी रहावे असा सल्ला डाँ. उर्मी ठक्कर यांनी देत अगदी सोप्या व ओघवत्या भाषा शैलीत तणावमुक्त जिवन कसे जगावे यावर मार्गदर्शन केले.
येथील उपविभागीय कार्यालय येथे पोलीस उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रीडा मंडळातर्फे भुसावळ परिसर फैजपूर येथील पोलिसांसाठी तणाव मुक्ती कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी जवळ दीडशे पोलिसांची व अधिकाऱ्यांची उपस्थित होती.

यावेळी डाँ. उर्मी ठक्कर यांनी अगदी सोप्या व ओघवत्या भाषा शैलीत मार्गदर्शन केले. यात त्यांनी सांगितले की योग्य वेळी आहार, कमी असला तरी चालेल पण शांत झोप व मानसिक समाधान हे कसं मिळवता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी काही “ब्रेन गेम” घेतले व “श्वसनाचे व्यायाम” सांगितले यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला अनेक श्रोत्यांनी विचारलेल्या शंकांचे डॉ उर्मी ठक्कर यांनी निरसन केले पोलीस बांधवांचे आयुष्य देशासाठी व समाजासाठी त्यांच्या कुटुंबासाठी खूप मौल्यवान आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे आनंदी रहा.
दरम्यान
प्रारंभी महिला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आरती चौधरी यांनी अत्यंत मार्मिक शब्दात प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला यात त्यांनी सांगितले आजही समाजात पोलिसांच्या सहकार्यानेच महिला भगिनी सुरक्षित आहेत सर्व ठिकाणी अहोरात्र पोलीस बांधवांना कार्य करावे लागते अश्या परिस्थितीत पोलिसांनी त्यांच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीत तणावमुक्त राहणे आवश्यक आहे अन्यथा त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो हा परिणाम होवू नये यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले .
यानंतर पोलीस उपाधीक्षक पिंगळे यांनी मनोगत व्यक्त करून सांगितले की पोलीस बांधवांना आपले कर्तव्य व जबाबदारी सांभाळून अहोरात्र ड्युटी करावी लागते काम करतांना स्वतःकडे लक्ष देणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे व कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे हे सर्व करतांना कुठेही ताण निर्माण झाला तर त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होत असतो काम करतांना सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नेहमी आनंदी व तणावमुक्त राहावे असे आवाहन केले

या प्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे सतीश कुलकर्णी, भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम, बाजार पेठ पोलीस स्टेशनचे निरिक्षक बबन आव्हाड, शहर वाहतूक शाखा भुसावळ रूपाली चव्हाण,नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे
शहर पोलीस ठाणे नेमणूक फैजपुर पोलीस स्टेशन निरिक्षक निलेश वाघ, यांच्या सह पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांची उपस्थिती होती
आभार प्रदर्शन प्राची राणी यांनी तर सुत्रसंचलन स्वाती नाईक यांनी अतिशय समर्पकपणे, सुंदर रीतीने केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप केला.
कार्यक्रमास महिला क्रीडा मंडळाच्या आरती चौधरी, लता होसकोटे, स्वाती नाईक, जयश्री ओक, कावेरी चौधरी, राजश्री कात्यायनी, प्राची राणे, सुनीता पाचपांडे, विणा ठाकुर, भारती चव्हाण, किरण शुक्ला, दिपाली सराफ, वैशाली पाटील, संगीता पाटील, विजया निकम, विनिता नेवे, वैशाली बर्‍हाटे, उपस्थित होत्या