नाहाटा महाविद्यालयात दुचाकी व घरगुती उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, नियोजन अभ्यास मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव पुरस्कृत MCED आयोजित महाविद्यालय व भुसावळ शहराच्या परिसरातील तरुणांसाठी 30 दिवसांचे दुचाकी व घरगुती उपकरणे दुरुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना प्रमाणपत्र व १०००/- रू. प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे SC व OBC/OPEN प्रवर्गाच्या तरुण व तरूणींसाठी असून प्रत्येकी 30 जागा मर्यादित आहेत. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात सकाळी 11 ते 12 या वेळेत दिनांक 25/08/ 2023 पूर्वी नाव नोंदणी करावी. जागा मर्यादित असल्यामुळे आधी नाव नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे
१) लिव्हिंग सर्टिफिकेट
२) जातीचे प्रमाणपत्र
३) एक पासपोर्ट साईज फोटो
४) आधार कार्ड
५) बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
६) नाव बदल प्रमाणपत्र (विवाहित महिलांसाठी)
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एस. व्ही. पाटील, उप प्राचार्य डॉ. बी.एच.ब-हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. एस. टी. धुम, प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. व्ही. ए. सोळुंके, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा. शितल सोनवणे, प्रा. अक्षरा साबळे, प्रा. शिवानी माळी, प्रा.एस.डी.अडकमोल आदी प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. महाविद्यालय व भुसावळ परिसरातील तरुण व तरुणींनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.