अल्पसंख्याक मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनेत १४४ कोटींचा घोटाळा ; चौकशीचे आदेश

दिल्ली- देशातील अल्पसंख्याक संस्थांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत १४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या तपासात ही बाब समोर आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मदरशांसह १५७२ अल्पसंख्याक संस्थांच्या तपासणीत ८३० संस्था बनावट आढळून आल्या असून, यामध्ये १९४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने मदरसा आणि इतर अल्पसंख्याक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांना ४,००० ते २५,००० रुपयांपर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २००७ ते २०२२ पर्यंत त्यांनी या योजनेअंतर्गत २२,००० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. आता तपासात अनेक बनावट संस्था आणि शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
अधिकारीही निघाले बनावट काही राज्यांकडून तक्रारी आल्यानंतर,

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने NCAER द्वारे याची तपासणी केली. यात १५७२ पैकी ८३० संस्था बनावट असल्याचे आढळून आले. म्हणजे ५३ टक्के संस्था बनावट होत्या. या संस्थांचे २२९ अधिकारी, अगदी नोडल आणि जिल्हा अधिकारीही बनावट निघाले.