सरदार पटेल मित्र मंडळाचा वाळूज महानगर येथे स्नेहमीलन कार्यक्रम

संभाजीनगर/-
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (लेवा पाटीदार ) मित्र मंडळा तर्फे वाळूज महानगर येथे स्नेह मिलनाचा कार्यक्रम आणि मोफत नेत्र तपासणीचे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक व्ही.आर. महाजन (LPPA छ.संभाजीनगर चे अध्यक्ष) होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भातृ मंडळ छत्रपती संभाजीनगर चे अध्यक्ष सुरेश कोलते व प्रसिध्दी प्रमुख प्रवीण जंगले उपस्थित होते. यांनी सर्व समाज एका छताखाली येऊन एक संघ होण्याचे आवाहन केले. नुकतेच बीड येथे आर.टी.ओ म्हणून नियुक्त झालेले भूषण पेटकर आणि स्थानिकचे ज्येष्ठ सामाजिक मान्यवरांची ही उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष(बजाज नगर) सुरज सुनील कोल्हे आणि सचिव यशवंत चौधरी, नेमा महाजन, मनोज नारखेडे, दिपक अत्तरदे, राजेंद्र भंगाळे, शशिकांत राणे, कल्पेश पाटील,पंकज चोपडे,गणेश पाटील, सुनील बोरोले, निलेश फिरके, विजय कोल्हे तसेच मंडळाच्या इतर कार्यकर्त्याचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानले आहेत.तसेच काही कारणास्तव उपस्थित न राहिलेल्या समाज बांधवांनी प्रांतवाद सोडून यापुढील कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सूरज कोल्हे यांनी केले आहे.