स्वातंत्र्य दिनानिमित्त सखी श्रावणी संस्थेतर्फे व पर्यावरण गृप तर्फे रोप वाटप :


भुसावळ – स्वातंत्र्य दिनानिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे व पर्यावरण गृप तर्फे वृक्ष संवर्धनासाठी रोप वाटपाचा उपक्रम सातत्याने घेण्यात येत आहे यंदा सुद्धा १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या अमृत महोत्सवा निमित्त येथील आठवडे बाजार चौक येथे दुपारी 3 वाजता
सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय सस्थाध्यक्षा सौ राजश्री नेवे यांचे नेतृत्वात विविध आयुर्वेदिक, डेरेदार सावली देणारे, आॅक्सिजन देणारे अश्या विविध रोपांचे (वृक्ष ) हाॅकर्स व ग्राहकांना वाटप करण्यात आले, यात जे नागरिक वृक्षसंवर्धन करतील त्यांनाच रोपांचे वाटप करण्यात आले, यासाठी
नाना पाटिल सर व सुर्यकांत पाटील , समाजसेवक जाकिर पटेल यांचेसह हाॅकर्स झोन संघटना यांचे अनमोल सहकार्य लाभले,
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे, कामिनी नेवे, संगिता भामरे, माया चौधरी, वंदना झांबरे, स्मिता माहूरकर,राजश्री सुरवाडे, यांच्यासह सदस्या व नागरिक उपस्थीत होते .यशस्वीतेसाठी उमेश नेवे , सै.मुश्ताक, रफीक देशमुख, जावेद खान, हारुन शेख यांचेही सहकार्य लाभले,