वरणगावात नवीन पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाहीन पध्दतीचे सुरू असताना शिवसेना जिल्हाप्रमुखांनी पाडले काम बंद :

पाईप तीन फुटाएवजी एकाच फुटावर टाकून काम उरकण्याची ठेकेदाराला लगीन घाई

एमजीपीसह नगरपरिषदचा कोणीही अभियंता किंवा कर्मचारी कामावर लक्ष द्यायला तयार नाहीआंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खात असल्याची परिस्थिती :

भुसावळ – वरणगाव येथील नगरपरिषदच्या माध्यमातून शहरात २५ कोटीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन कुठल्याही प्रकारचा भविष्याचा विचार न करता तीन फुटा ऐवजी एकाच फुटावर पाईपलाईनचे बोगस निकृष्ट रात्री काम सुरू असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांनी रात्री सुरू असलेले काम थांबवून संबंधित कंपनीच्या अभियंत्याला जागेवर बोलवून मीटर टेपने खोदलेल्या पाईप लाईनची खोली मोजून दोनच फूट भरत असल्याने शिवसेना स्टाईलने अभियंता मुंडे यांना चांगलेच फैलावर घेतल्याने अभियंत्याची बोबडीच बंद पडली. हा प्रकार शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भोगावती नदी पात्रातील सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनचे काम ठिकाणी घडला.

वरणगाव शहरात नगरपरिषदच्या माध्यमातून २५ कोटीच्या नवीन पाणीपुरवठ्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु हे काम अतिशय दर्जाहीन आणि निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा प्रकार समोर आलाआहे. यामध्ये पाईपलाईनचा खड्डा तीन फुटा ऐवजी दोन फुट खोदून एका फुटावरच पाईपलाईन टाकल्या टाकली जात आहे. वरतून कुठल्याही प्रकारचा मुरूम न टाकता खोदलेल्या मातीनेच पाईपलाईन बुजण्याचे काम रात्री जोरात सुरू आहे. या कामावरती संबंधित ठेकेदाराचा अभियंता तसेच नगरपरिषदचा अभियंता आणि एमजीपीच्या अभियंता या तिघांपैकी कोणीही या कामावरती लक्ष ठेवायला तयार नाही. अतिशय दर्जा हिन नीकुष्ठ काम सुरू असल्याने पाईपलाईन टाकण्याच्या ठिकाणी फेवर ब्लॉक काढून टाकल्यानंतर व्यवस्थित लेव्हल न करताच पुढे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराचा आहे. कोणत्या भागात पाईपलाईन साठी खड्डे खोदून ते खड्डे तसेच न बूजताच ठेवले आहे. काही भागात गटारीच्या पाण्यातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. हा सर्व प्रकार शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, शहरप्रमुख संतोष माळी, युवा सेना जिल्हा युवाअधिकारी चंद्रकांत शर्मा, उप शहरप्रमुख सुनील भोई, संजीव कोळी, हनीफ कच्ची, शेख अरबाज, शाखाप्रमुख शेख सत्तार सुखदेव धनगर, अशोक शर्मा, आबा सोनार सह गावातील अक्सा नगर, मोठी होळी, मोठा माळी वाडा भागातील नागरिकांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने रात्री उपस्थित होते.