भुसावळ – भुसावळच्या इतिहासात प्रथमच सौदर्यात वाढ म्हनून जामनेर रोड वरील स्व मोटू सोबराज चौकात आता जेसीआय भुसावळ ताप्ती तफै जेसीआय क्लॉक टॉवर बणवण्यात येत आहे. आधी तेथे नगर पालीकेने कारंजे लावले होते.गेल्या कित्येक वर्षा पासून कारंजे हे बंद अवस्थेत होते.
त्यामुळे जेसीआय च्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे ह्या तेथे जेसीआय तर्फे क्लॉक टॉवर लावणार आहे.
या टॉवरच्या भुमिपुजन सोहळ्यासाठी रविवारी जेसीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष एम के कार्थिकेयन भुसावळ शहरात आले होते.
यावेळी आमदार संजय सावकारे व जेसीआय च्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी जेसीआय क्लॉक टॉवरचे भुमीपुजन केले. प्रसंगी न पा मुख्याधीकारी महेश वाघमोडे,जेसीआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निलेश झवर,आंचल अध्यक्ष जितेंद्र बोरा,सचिव जयश्री अग्रवाल, उदयोजक मनोज बियाणी,डॉ.संगिता बियाणी,विकास पाचपांडे, संगिता अग्रवाल,नुतन फालक, मनीषा पाटील,पल्लवी झोपे,दिपा पटेल,मकरंद चांदवरकर,सुनिता पाचपांडे, हेमा बेहरा सह जेसीआय भुसावळ ताप्ती चा परीवार उपस्थित होते.
हे टॉवर साधारण पंधरा ते वीस फुट उंच राहील तर यावर लावण्यात येणारे क्लॉक सौर उर्जेवर चालणार आहे. साधारण दोघ दिघ बाजूने क्लॉक दिसणार असून दोन ते तीन महिन्यात तयार करणार असे सांगण्यात आले आहे.
शहरात प्रथमच क्लॉक टॉवर बनणार असल्याने शहरवासी आनंद व्यक्त करत आहे.
जेसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जेसीआय भुसावळ ताप्ती क्लब अध्यक्षाचे रजनी सावकारे व त्यांच्या टीम चे कौतुक केले कारण की संपूर्ण भारतातील भुसावळ शहरात हा पहिला जे सी आई चा कलोक टॉवर होणार आहे,देश पातळीवरचा हा प्रोजेक्ट पूर्ण भारतात आजपर्यंत कुठेही झाला नाही असे आवर्जून सांगितले तसेच भुसावळ चा क्लब हा फकत महिलांचा असूनही गेल्या सहा महिन्यांत क्लब चे कार्य कौतुकास्पद आहे व बेस्ट लेडी चेपटर म्हणून क्लब चा उल्लेख केला…
यावेळी त्यांनी जळगांव रोड वरील जेसीआय च्या फलकाचे अनावरण देखील केले.
सूत्रसंचालन डॉ मोनिका अग्रवाल यांनी तर आभार सचिव जयश्री अग्रवाल यांनी केले….
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपा पटेल,सोनल जवर,पल्लवी झोपे,ऋचा अग्रवाल,ज्योती दरगड,हेमा बेहरा,निकिता अग्रवाल,राखी जवर,आभा दरागड,रेखा व्यास,श्रुती लाहोटी, अहुजा,सुनीता अग्रवाल,सुनीता दरगड व संपूर्ण क्लब च्या सदस्यांनी परिश्रम घेतले…
…



