भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे पितृदिना निमित्त
तालुक्यातील मांडवेदिगर येथील पावरी वस्ती मध्ये आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप : करण्यात आले . यामध्ये
सोलापूरी चादर, साखर, चहा साठी कप, पारले जी बिस्किटे,
आंघोळीसाठी रुमाल, कापडी पिशव्या, लहान मुलांना रोटरी क्लब चे टीशर्ट ह्या सर्व वस्तू वाटप करण्यात आल्या .
सदर वस्तू हयांश भुषण महाजन (पुणे) ह्यांच्या कडून वाटप करण्यात आल्या .
यावेळी अध्यक्ष नुतन फालक सचिव मनीषा पाटील रो राजेंद्र बाविस्कर रो हिरामण फालक उपस्थित होते.



