जळगाव : जिल्ह्यात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असतानाच एमआयडीसी पोलिसांनी पारोळासह भडगाव व नाशिक जिल्ह्यातून पाच दुचाकी चोरी करणार्या जिल्ह्यातील तिघा संशयित आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.
संशयितांकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे चोरटे हे गॅरेज काम करणारे मॅकेनिक आहेत. जळगाव रायसोनि नगर अयोध्या नगर येथील फिर्यादि अनिकेत अशोक पवार यांची अँक्टीवा एप्रिल महिन्यात चोरीला गेल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.
चोरीच्या तपासा दरम्यान एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पारोळा तालुक्यातील रहिवासी व गॅरेजवर काम करणार्या तिघां संशयित आरोपी यात नंदकिशोर उर्फ बाळा सुभाष पाटील वय 21, हर्षल उर्फ दादु सुभाष देवरे वय 21 दोघे
रा. सारवखेडे ता. पारोळा जि जळगाव यांना दिनांक 06.06.2023 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तसेच आरोपी
संदीप राजेंन्द्र पाटील वय 21 रा. करमाळा ता पारोळा जि जळगाव यास दिनांक 8. रोजी ताव्यात
घेतले
सदर गुन्हांत तिन्ही आरोपी यांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले. जळगावच्या गुन्ह्या व्यतिरीक्त अन्य चार दुचाकी इंदीरानगर, नाशिक आणि पारोळा पोलिसात तसेच भडगाव आणि भडगाव-पाचोरा रस्त्यावरुन चोरी केलेल्या आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार जळगाव जिल्हा व . अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी ., तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित , व पोलीस निरीक्षक
जयपाल हीरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउप निरी आनंदसिंग पाटील, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, जितेंन्द्र
राजपुत, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोकों छगन तायडे, ईश्वर भालेराव पोहेकॉचालक इम्हीयाज खान
अशांनी केली आहे. गुन्हांचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत
आहेत.



