भुसावळ : रीमोल्डींग कामासाठी मध्य रेल्वेच्या नांदगाव रेल्वे स्थानकावर ब्लॉक घेण्यात आला असून 29 व 30 मे रोजी आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या मंगळवारी रद्द
11125 भुसावळ-ईगतपुरी पॅसेंजर, 11119 ईगतपुरी-भुसावळ पॅसेंजर ट्रेन, 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, 11025 भुसावळ-पुणे एक्सप्रेस, 12139 मुंबई-नागपूर ट्रेन रद्द करण्यात आली आहे.
या गाड्या उद्या सोमवारी रद्द
11114 भुसावळ-देवळाली एक्सप्रेस, 11026 पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, 12140 नागपूर-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल
12753 नांदेड-निजामुद्दीन एक्स्प्रेस मंगळवारी अकोला-भुसावळमार्गे तर याचदिवशी 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अकोला-भुसावळ मार्गे धावणार आहे. सोमवारी 12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस भुसावळ कॉर्ड लाईन, अकोलामार्गे तर 12718 निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस जळगाव, उधना, वसई रोहा मार्गे निजामुद्दीन सुटणार आहे.


