मुक्ताईनगर:-येथील साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.अ.फ.भालेराव यांची जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष अमनजी मित्तल यांनी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.त्या बद्द्लश्री विकास महाजन (ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे राज्य कार्याध्यक्ष तसेच राज्याचे अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर जिल्हाध्यक्ष हेमंत दादा भांडारकर राज्य समन्वय समिती अध्यक्ष सतीश साकोरे उपाध्यक्ष रामचंद्र तांबे सचिव संतोष बापू मगर कोषाध्यक्ष उत्तम झेंडे यांनी अभिनंदन केले आहे.



