भुुुुसावळ – दीपनगर येथे भारत हेवी इलेकट्रीकल्स लिमिटेड या राष्ट्रीय कंपनीचा ६६० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प सुरु असून लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. कर्मचारी , त्यांचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या जनजागृतीसाठी कंपनीतर्फे ‘ भेळ अँड अससोसिएट्स युनिटी रन’ चे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ४०० हुन अधिक आबालवृद्ध नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यात ८० हुन अधिक महिलांचा सहभाग होता . दीपनगर येथील महाजनकोच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम पार पडला . ३ किमी व ५ किमी या दोन गटांत वसाहतीतील रस्त्यावर अतिशय उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदविला .यावेळी भेळ इंडिया लिमिटेड चे मुख्य प्रबंधक दिनेश जावडे , महाजनको चे मुख्य अभियंता मोहन आव्हाड , विवेक रोकडे , वरिष्ठ अभियंता किशोर शिरभीये ,प्रकल्प संचालक डी एन सिंग , प्रकल्प व्यवस्थापक क्रिशेंदू सरदार , सानंम श्रीनिवास , इंदवेल कंपनी चे प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास बोथा , जी अँड जे कंपनीचे दिलीप यादव ,अल्फा कंपनीचे बी देवा , वरिष्ठ संचालक मंदीपसिंग ऊबेजा, एस के शर्मा , एस के पंजा , एम के तेली , सचिन दोंडगे , आर राजेंद्रन , भेळ इंडियाचे व्यवस्थापक संदीपकुमार वर्मा , भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स अससोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण फालक , प्रवीण पाटील व प्रवीण वारके उपस्थित होते .
सकाळी ६.३० वाजता ५ किमी व ७.०० वाजता ३ किमी च्या रन ला सुरुवात झाली .रन आधी डॉ. चारुलता पाटील , डॉ. स्वाती फालक , दीपा स्वामि व प्रवीण पाटील यांच्यातर्फे वॉर्मअप व रनींग नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाईझ घेण्यात आली .याशिवाय पारुल वर्मा , किरण गोंथला , नीलांबरी शिंदे व पूनम सुरवाडे यांच्यातर्फे झुंबा सेशन देखील घेण्यात आले .
रनिंगच्या रूटवर ठीकठिकाणी आयोजकांतर्फे पेयजल , बिस्किट्स , चॉकलेट्स ची व्यवस्था करण्यात आली होती .यासाठी राजेंद्र ठाकूर , सारंग चौधरी , मंगेश चंदन ,विश्वजित वाघ , संस्कार पाटील आदी स्वयंसेवक विशेष मेहनत घेत होते .
रनिंगनंतर प्रत्येक स्पर्धकास पदक प्रदान करण्यात आले व नंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली .यावेळी ममता ठाकूर , हर्ष लोखंडे , सुवर्णा पाटील व अनिता पाटील यांनी पदक वितरणाचे काम केले .
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे प्रयोजकांचा विशेष सत्कार करण्यात आला .त्यानंतर सोडत पद्धतीने ४ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली . याशिवाय समाबाई मुंडे या ७० वर्षीय आजीने नऊवारी पातळ परिधान करून न थकता रनिंग केल्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाशचंद यांनी तर आभार संदीपकुमार वर्मा यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित अग्रवाल ,आनंद सपकाळे , छोटू गवळी , विलास पाटील , हर्षल लोखंडे , मुकेश चौधरी , प्रशांत अत्रे , पूनम कुलकर्णी ,अर्चना चौधरी , माधुरी चौधरी यांनी सहकार्य केले .



