खडका-किन्ही येथील सर्वोदय हायस्कूल येथे तीस वर्षानंतर रंगला दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा :

भुसावळ – खडका-किन्ही येथील सर्वोदय हायस्कूल येथे तीस वर्षानंतर १९८९-९०ची इयत्ता दहावी झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 29 रोजी पार पडला यावेळी त्यांच्या वेळेस शिकवणारा माजी शिक्षक स्टॉप ला सुद्धा बोलवण्यात येवून सत्कार करण्यात आला
मित्रांनो आपण कितीही मोठे झालो कुठेही गेलो तरी शाळा आणि शाळेच्या आठवणीसाठी आपल्या मनात नेहमीच एक आपुलकीचे स्थान असते आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने जर त्या आठवणी पुन्हा जगायला मिळणार असतील तर …..
शाळेचे फक्त नाव जरी काढले तरी सगळे फ्लैशबॅक डोळ्यासमोरून जातात त्या सगळ्या आठवणी ज्या आम्ही 33 वर्षापूर्वी या शाळेत कमविल्या होत्या.त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही सन 1989/90 बॅच चे सर्व मित्र – मैत्रिणी आजचे मोठेपण विसरून ३३ वर्षापूर्वीच्या लहानपणात जगण्यासाठी गेट टुगेदर च्या माध्यमातून एकत्र आलो
आमच्यावर आमच्या गुरूंनी जे संस्कार केलेत व आमचे जीवन समृध्द केले त्याची परतफेड तर होऊच शकत नाही तरीसुद्धा एका कृतज्ञ भावनेने आम्ही आमच्या गुरूंचा सत्कार करून आम्हाला ३३ वर्षापूर्वी जगलेल्या आठवणी त्यांच्यासोबत घालवायच्या होत्या त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे केलेला हट्ट त्यांनी विद्यार्थी हट्ट म्हणून पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.
मला खात्री आहे की आज सर्व याठिकाणी जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातील आणि जातांना नवीन आठवणी सोबत घेऊन जातील
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र भिरूड. माजी मुख्याध्यापक एल जी बेंडाळे सुरेश येवले.चेअरमन मधुकर चौधरी. संजय चौधरी माजी शिक्षक एल के बोरोले पी एन वारे जे आर जावळे.एस आर मोरे .एल पी पाटील.डी पी साळुंके यांच्या सह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रवींद्र पोळ व संगीता भगत यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार उपस्थित सर्व विद्यार्थी यांनी केला.