भुसावळ – विद्यार्थ्यानी नृत्यासह चित्तथरारक व साहसात्मक विविध कलाविष्कार सादर करीत जल्लोषात येथील बियाणी मिलिटरी स्कूलचे स्नेहसंमेलन मंगळवारी उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल पवन कुमार व पोलीस अधीक्षक एम राजकुमार हे होते

यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ. संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, अभियंता रोनक बियाणी, पियुष बियाणी,डॉ. मुस्कान बियाणी, गोपाळ ठाकूर, राजेश पारिक,प्रवीण भराडीया, आर के पाटील व प्रिन्सिपल डी एम पाटील, कांचन जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पवन कुमार यांनी द्वीपप्रज्वलन करून व सरस्वती पूजन तसेच बी सी बियाणी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी मिलिटरी स्कूल मधील एक हजार विद्यार्थ्यानी विविध गाण्यावर नृत्य सादर करून कलाविष्कार सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक एम राजकुमार व लेफ्टनंट कर्नल पवन कुमार यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन प्रिन्सिपल डी एम पाटील यांनी तर आभार डॉ संगीता बियाणी यांनी मानले.


