नृत्यस्वरांजलीत विद्यार्थांची धमाल : नाहाटा महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात :

भुसावळ – कला विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात नृत्यस्वारांजली जल्लोष साजरा करण्यात आला .’नृत्यस्वरांजली ‘उद्घाटन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन .महेश फालक, सचिव – विष्णू चौधरी, खजिनदार संजयकुमार नाहाटा, प्र प्राचार्य डॉ एस . व्ही . पाटील, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. ई . जी . नेहते, उपप्राचार्य डॉ बी. एच. ब-हाटे, उपप्राचार्य डॉ. एन . ई . भंगाळे, उपप्राचार्य डॉ . ए . डी . गोस्वामी कला मंडाळाचे चेअरमन डॉॅ . पी ए . अहिरे , आदी उपस्थित होते . ‘नृत्यस्वरांजली ‘उद्घाटनानंतर पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले की विद्यार्थींनी अभ्यासात सातत्य ठेऊन कठोर परिश्रमाने यश प्राप्त करता येते . मात्र याकडे विद्यार्थी दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते . सोशल मीडिया युगात फसवेगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे . यापासून कॉलेज मधील तरुण-तरुणीनी सावध राहावे . ‘ ‘नृत्यस्वरांजली ‘ स्वागत व उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले . यात लावणी, सिनेगीत,भावगीत, समूहनृत्य, एकाकी, एकपात्री नाटक, यासह विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले . यापूर्वी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा, रांगोळी, चित्रकला, कोलाज , व्यंगचित्र, इन्स्टॉलेशन , क्ले मॉडेल , मेहंदी, स्पॉट स्पेटींग,फोटोग्राफी व पारंपारिक वेशभूषा यात विद्यार्थ्यांनी आपले सहभाग नोंदविला .मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली . कार्यक्रमाचे परीक्षक डॉ . जे . एफ . पाटील, प्रा शलाका निकम हे होते . यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .