भुसावळ येथे वसंतोत्सवाचे आयोजन ;


भुसावळ – येथे वसंत पंचमी चे निमित्ताने नुपूर कथक डान्स अँकॅडमी तर्फे वसंतोत्सव या शास्त्रीय कथक नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरुषोत्तम नगर येथील गायत्री शक्तीपीठ येथे गुरुवार दीं. २६जानेवारी रोजी सायंकाळी ५:३०वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल .यात नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे विद्यार्थी वसंत ऋतू चे विविध नृत्य सादर करतील. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.