सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेचा समाजपयोगी उपक्रम : यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना किराणा वाटप :


भुसावळ – येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय या सामाजिक संस्थेतर्फे विविध उपक्रम घेण्यात येतात .आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्षा सौ राजश्री नेवे यांचे मार्गदर्शना खाली
आदिवासी बांधव , अंध बांधव , गरीब नागरिक , लहान मुले व, अंध व अपंग बांधव, अपंग जेष्ठ नागरिक यांचेसह विविधांगी उपक्रम राबविन्यात आले आहे
हेच ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून संस्थेच्यावतीने शनिवार 24 डिसेबर रोजी यावल तालुक्यातील आंबापाणी येथिल आदिवासी पाड्यावर किराणा ( किट) वाटप करण्यात आला ,
या किट मध्ये (आटा, तांदुळ, तेल, साखर, चहा पावडर, तिखट, हळद, मिठ) या वस्तुंचा समावेश आहे .
प्रसंगी सखी श्रावणी संस्थेच्या पदाधिकारी माया चौधरी, संगिता मंदवाडे, मिनाक्षी दलाल, मंजिरी माहूरकर, स्मिता माहुरकर, वंदना झांबरे, मनिषा मिस्तरी, हे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर आशा पाटील, प्रमिला भिरूड, रूहि तळेले, काजल जावळे, गौरव जावळे, यांचे अनमोल सहकार्य लाभले . तर नितिन माहुरकर, अल्लाउद्दीन तडवी, समीर शेख, उमेश नेवे यांचे मार्गदर्शन लाभले .