भुसावळ – ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयास नॅक बेंगलोर, महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी येणार आहे. हे महाविद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नॅकच्या चौथ्या सायकल साठी सामोरे जाणारे महाविद्यालय असून या आधी महाविद्यालयाला तिन्ही सायकल मध्ये A ग्रेड मिळालेली आहे. महाविद्यालयात नॅकने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सर्व सुखसुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे. महाविद्यालयात ICT Enable 16 वर्ग खोल्या आहे व 4 स्मार्ट क्लास रूम आहे. समृद्ध असे ग्रंथालय असून एक लाखाच्यावर विषयाचे पुस्तके त्याचप्रमाणे संदर्भ पुस्तके उपलब्ध आहे. महाविद्यालयात पदवी स्तरावर 11 व पदव्युत्तर स्तरावर 17 वेगवेगळ्या कोर्सेसचे वर्ग चालवले जातात. यामध्ये B.A., B.Com, B.Sc, BCA, BBM, BBA, BMS, B.Voc तर पदवी स्तरावर M.A, M.Com, M.Sc राबवले जातात. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिमखाना, सांस्कृतिक विभाग, इंक्युबॅशन सेंटर यासारखे असंख्य सुविधा पुरवलेले आहे. महाविद्यालयात विद्यापीठात मान्यता असलेले पाच संशोधन केंद्र आहे, त्यात एकूण 100 विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयातील प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून नेमलेले असून त्यांची संख्या सुमारे 25 आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकांना त्यांच्या संशोधक कार्यात मदत करण्यासाठी अनेक चर्चासत्र व राष्ट्रीय परिषदा संस्थेमार्फत आयोजित करण्यास मदत होते. महाविद्यालय स्तरावर सुद्धा अनेक चर्चासत्र, सेमिनार, राष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या जातात. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक दरवर्षी नामांकित संशोधन पत्रिकेमध्ये त्यांचे संशोधन निबंध प्रकाशित करीत असतात. महाविद्यालयाने वेगवेगळ्या समितीमार्फत युवती सभा, विद्यार्थी कल्याण विभाग, NSS, NCC, Sport सारखे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थिनीसाठी महाविद्यालयाने महिला रूम, महिला विश्रामगृह उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा विश्रामगृह उपलब्ध केलेले आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयाची एक प्रशस्त अशी कॅन्टींग, सायकल स्टॅन्ड उपलब्ध आहे. महाविद्यालयाच्या प्रत्येक विभाग हा इंटरनेटने जोडला गेलेला आहे. अशाप्रकारे अनेक सुविधा महाविद्यालयात सध्या उपलब्ध आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत शैक्षणिक विकाससाठी पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. याशिवाय प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांची क्रेडिट सोसायटी आहे. विद्यार्थ्यांना माहिती अर्ज व माहिती पुस्तिका उपलब्ध करुन घ्यावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी ग्राहक भंडार आणि वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध आहे, या संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे श्रेय ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा आणि सन्माननीय संचालक मंडळ यांचे आहे. या संपूर्ण नॅकच्या कार्यासाठी प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. यासाठी नॅक समितीने समन्वयक उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, सर्व क्रायटेरिया प्रमुख, डी. व्ही. व्ही प्रमुख, क्रायटेरिया सदस्य, स्टेरिंग कमिटी सदस्य तसेच महाविद्यालयीन कार्यालय व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभत आहे.



