भुसावळ । प्रतिनिधी
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी श्रीसंत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .
भुसावळातील तेली समाज मंगल कार्यालयात श्री .संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी संतोष बी . चौधरी, कैलाश चौधरी, आऊ चौधरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन तर माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे हस्ते मुर्तीपुजन व माल्यार्पण करण्यात आले . यावेळी सचिव अशोक चौधरी यांनी मनोगत व्यक्त करीत आजच्या प्रमाणे २१ डिसेंबर रोजी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांनी हजर रहावे असे आवाहन केले . कार्यक्रमाच्या शेवटी श्री संताजी जगनाडे महाराज यांची आरती होवून सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमास बाळू चौधरीं , देवीदास चौधरीं,अशोक चौधरीं , गणेश सोनवणे , दिलीप चौधरीं , सुरेश चौधरीं, किरण चौधरीं, सुनील चौधरीं , गोपाळ चौधरीं, विजय चौधरीं , राकेश चौधरीं, रमेश चौधरीं , सुरेश तेली , वसंत , एल पी चौधरीं , सुधीर चौधरीं, एकनाथ कपले , दत्तू कपले , प्रवीण चौधरीं , सुनील सर , दिपक चौधरीं , प्रकाश चौधरीं , राजेश बोरसे , लक्ष्मण चौधरीं , मिलिंद चौधरीं , दौलत चौधरीं यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेली समाज कार्यकारणी सदस्य यांनी
परिश्रम घेतले .



