कोलते फाऊंडेशन संचालित द वर्ल्ड स्कूल भुसावळ मध्ये दिवाळी उत्साहात साजरी :


भुसावळ – कोलते फाऊंडेशन संचालित द वर्ल्ड स्कूल भुसावळ मध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी शाळेचे डायरेक्टर सी.ए. रोहित कोलते आणि शाळेच्या मुख्यध्यापीका पेट्रिशीया हॅसेट यांनी शाळेतील विध्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व इको फ्रेंडली दिवाळी साजरी करावी प्रदूषण टाळावे अशा प्रकारे माहिती विध्यार्थ्यांना दिली.शाळेतील विध्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रांगोळ्यांची सजावट केली,त्याच बरोबर कंदील लावण्यात आले.व दिव्यांनी भारताचा नकाशा बनवण्यात आला. ह्या सर्व कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य केले.