रस्ते कामाची चौकशी व्हावी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा किंवा दोषीवर कारवाई करावी इतर मांगण्यासाठी शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ – भुसावळ हायस्कूल समोरील कॉक्रीट रस्ते कामाची चौकशी करून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा किंवा दोषीवर कारवाई करावी व इतर मांगण्यासाठी शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन देण्यात आले .
भुसावळ शहरातील भुसावळ हायस्कूल समोरील व अष्विनायक कॉलनीला जोडणारा रस्ता गेल्या ६ महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून कॉक्रीट करण्यात आलेला होता परंतु ६० लाख रु खर्च करून झालेला हा रस्ता ६ महिन्यातच उखडून गेलेला आहे तर काही ठिकाणी या रस्त्याला खड्डे पडलेले आहे तरी या रस्त्याची सखोल चौकशी करून हा रस्ता सभंदित ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यावा अन्यथा नगर पालिका कर्यालासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेने तर्फे देण्यात आला . तसेच रामानंद हॉल ते गजानन महाराज मंदिर या भागातील रिंग रोड चे काम सुरू झालेले असून लोणारी हॉल ते रेल्वे लाईन पर्यंतचा रिंग रोडचा रस्ता सुद्धा सबंधित ठेकेदाराकडन करून घ्यावा व या भागातील ८ हजार लोकांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली .
भुसावळ शहरामध्ये नगर उत्थान योजनेतंर्गत १२ कोटी रु चे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतलेले होते परंतु आज पर्यंत w b m चे काम झालेले आहे वरील सिल कोट चे काम आज पर्यंत झालेले नाही ते काम सुध्दा तात्काळ सुरू करावे
तसेच प्रभाग क्र ८ मधील टीलू भाई गॅरेज ते मिरा ताई व संजय फालक ते एकनाथ पाटील यांच्या घरापर्यातचा रस्ता रस्ता मजूर झालेला कॉक्रीट चा रस्ता तात्काळ करावा अन्यथा ठेकेदाराला बिल व अनामत रक्कम अदा करू नये
भुसावळ शहरात तापी नदी ओसांडून वाहत असताना नागरिकांना ८ ते १० दिवसानंतर पाणी मिळते आता पावसाळा सुरू असताना सुध्दा नागरिकांना पाण्यासाठी १० दिवसाची वाट पाहावी लागते हा कालावधी ३ दिवसाचा करावा
जळगाव रोडवरील स्टिट लाईट गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे ते तात्काळ सुरू करावे
ह्या व इतर मूलभूत समस्या येत्या १० दिवसामध्ये मार्गी लावावा अन्यथा आपल्या कऱ्यलायसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे ,शिवसेना शहर प्रमुख हेमंत खंबाइत, विधानसभा शेत्र प्रमुख निलेश महाजन,तालुका संघटक धीरज पाटील,उपशहर प्रमुख,स्वप्नील सावळे,राकेश खरारे, पवन नाले,नरेंद्र लोखंडे,अरुण साळुंके,पिंटू भोई,सोनी ठाकूर, जितेंद्र पाटील,कडू चौधरी, शांताराम बईलंम,दिनेश बुंदेले, व शिवसैनिकानी दिला आहे