भुसावळात माजी सैनिकाला तीन अनोळखी इसमांनी लुटले !

भुसावळ – येथील जामनेर रोडवरील दुर्गा
कॉलनीतील माजी सैनिकाला भुसावळ शहरातील अष्टभुजा मंदिरा जवळ अनोळखी तीन इसमांनी लुटले याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राजेश मारुती कोल्हे वय 47 राहणार दुर्गा कॉलनी,जामनेर रोड भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
दिनांक 09/09/2022 रोजी रात्री 01: 30 वाजेला ते 02:00 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात नहाटा कॉलेज कडून नशिराबाद दिनांक 10/09/2022 रोजी 07:00 वाजेला येथे बजाज कंपनीची मोटर सायकल क्रमांक एम.एच.19 ए.के.8790 हिच्यावरून बहिणीकडे जात असताना भुसावळ शहरात नहाटा चौफुली कॉलेज जवळ सर्विस रोड वरून हायवे क्रमांक सहा वरून वांजोळा रोड कडेस जाणाऱ्या रस्त्याजवळ 3 अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या पॅन्ट व शर्टाच्या खिच्यातून मोबाईल,पावर बँक,आर्मी कार्ड तसेच 500 रुपये रोख असे एकूण 7,700 रुपयांचा मुद्देमाल शहरातील अष्टभुजा मंदिरा जवळ
बळजबरीने हिसकावून घेऊन मोटरसायकलने पळून गेले . याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुरुन 469/2022 कलम 392,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे.