भुसावळ – येथील बियाणी चेंबर्स मध्ये आरती अर्चना करून जल्लोषात ३१ रोजी आराध्य दैवत श्री गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रृपचे चेअरमन मनोज बियाणी यांनी त्यांच्या सुविद्यपत्नी तथा बियाणी गृपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत पूजा करून बाप्पाची स्थापना केली.

बाप्पाच्या स्थापनेने बियाणी चेंबर्स परिसरात जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. बियाणी चेंबर्स परिसरातील भाविकांनी यावेळी गणपती बाप्पा मोरर्याचा जयघोष घालत बाप्पाचे स्वागत केले. पर्यावरणाला धोका होणार नाही अशा गणपतीची स्थापना यंदा बियाणी चेंबर्स मध्ये केली आहे, बाप्पाच्या स्थापनेने बियाणी चेंबर्स परिसरात भावीकांची एकच गर्दी झाली होती. प्रसंगी बियाणी गृपचे उपाध्यक्ष विनोद बियाणी,डायरेक्टर रोनक बियाणी, पियुष बियाणी, गोपाळ ठाकूर,राजू मोरे,जिवीका ठाकूर सह बियाणी चेंबर्सचे कर्मचारी उपस्थित होते. बियाणी चेंबर्स मध्ये गेल्या २७ वर्षापासून बाप्पाची स्थापना केली जाते. बियाणी चेंबर्स मध्ये बियाणी यांच्या सहपरिवारासह बाप्पाची आरती दोघं वेळेस नित्य नियमाने केली जाते व दहाव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन तापी नदीच्या पात्रात केले जाते.


