भुसावळात जेष्ठ छायाचित्रकार आयोजित जेष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान.


भुसावळ – “कृष्ण धवल” काळाच्या “आठवणी” रूपात जेष्ठांच्या कार्याचा गौरव जागतिक फोटोग्राफी दिना निमित्त भुसावळतील ज्येष्ठ छायाचित्रकारां तर्फे करण्यात आला.
यावेळी जेष्ठ फोटोग्राफर यांच्या हस्ते कॅमेरा पूजन, पंडीत श्रीकांत घिर्णीकर याच्या मंत्रोप्चाराने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकारांचे पुष्प व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरसिहं राठोड यांनी युवकांना संभोधून सांगीतले की कॅमेराचा आदर करावा,कॅमेरा गळ्यातच असावा. फोटोग्राफी करताना मॅन्युअल फोटोग्राफी करावे. तर अनिल ढाके यानी भुसावळ मध्ये सर्व प्रथम रंगीत फोटो दुबई हून प्रिंट करून आणतानाचे अनुभव सांगीतले व त्यांनी त्यावेळेचे कॅमेरे बद्दल माहिती सांगीतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतसिहं राजपूत होते.सर्व जुन्या मित्रांना पाहून मान्यवरांना आनंद झाला.जुन्या काळाच्या आठवणी ताज्या झाल्या.
कार्यक्रमास आयोजक अविनाश साळी,श्याम गोविंदा,कैलास महाजन,शंभू मेंहदले,गणेश राठोड,भरत शिंपी आणि विवेक वणीकर आदींची उपस्तिथी होती.ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर व सविता सहजे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
यावेळी कार्यक्रमात जुना प्लेट कॅमेराचे विशेष आकर्षण होते. विशेष म्हणजे प्रथमच ज्येष्ठ छायाचित्रकारांना फेटे बांधून पूजन करण्याचा मान मिळाला त्यामुळे त्यांनी आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नीरज पाटील,सिध्देश राठोड,आदित्य पाटील,हर्षित अग्रवाल,रणजीत चौधरी,सतीश चांनगुडे,केशव जाधव,कृष्णा पाटील,प्रेक्षीत चौधरी यांनी परिश्रम घेतले.
सूत्र संचलन व आभार राजेंद्र जावळे यांनी मानले.