जळगावात दोन हॉटेलवर छापा ; २० हून अधिक तरुण तरुणीं पोलिसांच्या ताब्यात ;

जळगाव – शहरात वाढत्या अवैध धंद्यांना मार्गी लावण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्यांनी याप्रकरणी आज शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असणाऱ्या दोन हॉटेलांवर धाड टाकत तब्बल २० हून अधिक तरुण तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.या कारवाईमुळे जळगावात खळबळ उडाली आहे .
सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या सट्टा पेढी, जुगारचे अड्डे त्याचबरोबर देहविक्रीचे काम सर्रास सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वात औरंगाबाद महामार्गावर आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर तर भुसावळ महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळ एका हॉटेलवर पथकाने छापा टाकला. यावेळी या धाड़ीत दोन्ही ठिकाणाहून पथकाने २० पेक्षा जास्त तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. त्या सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्याच बरोबर संबंधित हॉटेलच्या मालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

अश्या प्रकारची कारवाई स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी करून स्थानिक पोलीस स्टेशनचा ढिम्मपणा उघड केला असल्याचे दिसते. त्यांच्या कारवाईने तरी संबंधित पोलीस स्टेशन यापुढे सजग राहून काम करेल. असा नागरिकांचा एकच सूर उमटला.