भुसावळ- भुसावळ डिविजन मधील जळगाव रेल्वे स्टेशन वर 14 ऑगस्ट विभाजन विभिषिका स्मृती दिवसानिमित्त प्लॅटफॉर्म क्र 3 वर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी उपस्थित जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांचा हस्ते करण्यात आले. सिनियर डीपीओ एन. एस. काझी यांचा मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्टेशन वरील कुली व प्रवाशांना आमदार राजू मामा भोळे यांच्या कडून तिरंगा चे वाटप करण्यात आले. तसेच रैली काढून भारत माता की जय, वंदे मातरम् चा घोषणा देत कार्यक्रम हा संपन्न झाला.
या कार्यक्रमा वेळी स्वातंत्र्य सेनानी , एपीओ व्ही. एस. वडनेरे , स्टेशन मॅनेजर अग्रवाल , आर. पी. एफ. मनोज सोनी , मंजुळा सपकाळे, सुजित जाधव ,दिनेश चौधरी, अंजली पाटील व स्टेशन वरील बाकी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच स्टेशन वर सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे प्रवासी या सेल्फी पॉइंट वर आवडीने फोटो काढत आहेत.



