लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्स्प्रेस या ट्रेनच्या थांब्याला नांदगाव येथे व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा

भुसावळ – राज्यमंत्री ना . रावसाहेब दादाराव पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री आणि डॉ. भारती प्रविण पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्स्प्रेस या ट्रेनच्या थांब्याला नांदगाव येथे (व्हिडिओ लिंकद्वारे) दि. १४.८.२०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवला.रावसाहेब दादाराव पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार आणि डॉ. भारती प्रविण पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार यांनी 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्सप्रेसला नांदगाव येथे (व्हिडिओ लिंकद्वारे) दि. १४.८.२०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवून थांबा तरतूद सुरु केली.

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मान्यवरांचे, माध्यम प्रतिनिधींचे आणि प्रवाशांचे मुख्यालय मुंबई येथून व्हिडिओ लिंकद्वारे स्वागत केले. भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित होते तर भुसावळ विभागातील वरिष्ठ अधिकारी नांदगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

दि. १४.८.२०२२ पासून प्रायोगिक तत्त्वावर खालील तीन गाड्यांना नांदगाव आणि लासलगाव येथे ६ महिन्यांसाठी थांबा देण्यात आला आहे.

नांदगाव येथे
15017 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर एक्सप्रेस नांदगाव येथे ११.२९ वाजता पोहोचेल आणि ११.३० वाजता सुटेल.

15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नांदगाव येथे ११.३९ वाजता पोहोचेल आणि ११.४० वाजता सुटेल.

22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्सप्रेस नांदगाव येथे ०५.०४ वाजता पोहोचेल आणि ०५.०५ वाजता सुटेल.

22178 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महानगरी एक्सप्रेस नांदगाव येथे ०५.३९ वाजता पोहोचेल आणि ०५.४० वाजता सुटेल.
लासलगाव येथे
11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस कामायनी एक्स्प्रेस १७.३७ वाजता लासलगाव येथे पोहोचेल आणि १७.३८ वाजता सुटेल.

11072 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस १७.५९ वाजता लासलगाव येथे पोहोचेल आणि १८.०० वाजता सुटेल.