शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी घेतला शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा आढावा


भुसावळ – शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान 2022 ते 2024 साठी चे नुकतेच रावेर लोकसभेत सुरू झाले असून सदर सदस्य नोंदणीचा आढावा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी रावेर लोकसभेतील फैजपूर सावदा मारूळ येथे जाऊन प्रत्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घेतला यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी आणि सदस्य नोंदणी सुरू केल्याचे समजले वार्डा प्रमाणे व गावाप्रमाणे सदस्य नोंदणी सुरु आहे यावेळी गाव तसेच वार्ड तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक अभियान सर्वांनी एक दिलाने राबवावे व पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांना ही वाढदिवसाची भेट द्यावी असेच सांगितले माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही या वेळी प्रतिपादन केले असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी मार्गदर्शन केले यावेळी अल्पसंख्यांक शिक्षक सेनेचे मुंबई अध्यक्ष इलियास शेख सर ज्येष्ठ शिवसैनिक श्री आप्पासाहेब चौधरी फैजपुर शिवसेना उपतालुका प्रमुख यावल राजूभाऊ काठोके मारुड येथील ज्येष्ठ शिवसैनिक युनुस अली सय्यद मुमताज अली फारुकी सय्यद सय्यद आलम शहाजहान आली संदीप माळी किरण मंडवाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते